गावाची ग्रामपंचायत

वराड हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. वराड हे गाव तालुका मुख्यालय मालवण (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 29 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 5 किमी अंतरावर स्थित आहे. वराड या ग्रा. प.हद्दीतील कुसरवे, वराड,भंडारवाडी हे तीन महसूल गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार कुसरवे, वराड,भंडारवाडी या तीन ही महसूल गावांची मिळून लोकसंख्या ३१३२ आहे.या गावामध्ये 22 वाड्या आहेत. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये 6 प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 8 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 3 कर्मचारी आहेत.

माहिती अधिकार १ ते १७ मुद्दे माहिती वराड